Nagpur University loss of 56 crore due to Corona  
नागपूर

कोरोनामुळे नागपूर विद्यापीठाला ५६ कोटींचा फटका

मंगेश गोमासे

नागपूर  ः कोरोना महामारीचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसला. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठालाही कोरोनामुळे चांगलाच मार बसल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठ महिन्यांत विद्यापीठाचे उत्पन्न ५६ कोटींनी घटले असल्याची माहिती समोर आली. याप्रकाराने विद्यापीठाच्या आगामी अर्थसंकल्पावर परिणाम होणार असून, विकासात्मक योजनांना फटका बसण्याची शक्यता आहे.

राज्यात मार्च महिन्यात टाळेबंदीची घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. याशिवाय वसतिगृहेही बंद ठेवण्यात आले. त्यामुळे विद्यापीठाला परीक्षेपासून मिळणारा निधी थांबला. विशेष म्हणजे विद्यापीठाला जवळपास ३५ कोटी रुपये परीक्षा शुल्कातून मिळत असतात. याशिवाय महाविद्यालयांचे संलग्निकरण आणि विलंब शुल्कातूनही पैसे मिळतात. 

याशिवाय, विद्यापीठाला रुसाच्या माध्यमातून निधी मिळत असतो. मात्र, यावर्षी टाळेबंदीमुळे विद्यापीठाच्या परीक्षा लांबल्या. महाविद्यालये बंद असल्याने संलग्नीकरणही बंद आहे. याशिवाय परीक्षेचे शुल्क घेऊ नये या मागणीसाठी विद्यार्थी संघटनांनी कुलगुरूंना निवेदन दिले होते. त्यातूनच कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात आलेले नाही. 

आता विद्यापीठस्तरावर अंतिम वर्षांची परीक्षा होत असून इतर वर्षाच्या परीक्षा महाविद्यालयस्तरावर घेण्यात येणार आहे. यामुळे विद्यापीठाचा शुल्कापोटी येणारा पैसा मिळणार नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी विद्यापीठाला एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान ६१ कोटी ९ लाख ३२ हजार ५५४ रुपये मिळाले होते. 

मात्र, यावर्षी कोरोनाचा फटका बसल्याने विद्यापीठाला केवळ ४ कोटी ६५ लाख ५३ हजार ९१२ रुपयांचा निधी मिळाला. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत ५६ कोटी ४३ लाख ७८ हजार ६४२ रुपयांची तूट आहे. याच्या प्रभाव विद्यापीठाच्या विकासात्मक कामावर पडणार असून, विविध नव्या प्रकल्पांना निधीअभावी पैसा मिळणार नसल्याचे दिसून येणार आहे.
 

कोरोनामुळे निधीचे मार्ग बंद
परीक्षा आणि महाविद्यालयाच्या संलग्नीकरणातून विद्यापीठाला या काळात पैसे येत असतात. मात्र, कोरोनामुळे सगळे मार्ग बंद असल्याने ५६ कोटी रुपयांचा निधी कमी झाल्याचे दिसून येत आहे.
डॉ. राजू हिवसे, वित्त व लेखा अधिकारी


संपादन  : अतुल मांगे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत संततधार! चार धरणं ओव्हरफ्लो; सातही जलाशयांची आकडेवारी समोर

WTC Final 2027 Venue: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल कुठे होणार? भारतीय संघ पात्र ठरू शकणार का? ICC ची घोषणा...

Crime News: शाळेत १० रुपये चोरल्याचा आरोप; रागात शिक्षिकेकडून मारहाण, घरी येताच १० वर्षीय मुलीनं जीवन संपवलं

Latest Marathi Update : धुळे जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील देवभाने फाट्यावर रास्ता रोको आंदोलन

Rahul Gandhi Protest : PM निवासस्थानाबाहेर घातपात करायचा होता का?; एकनाथ शिंदेंनी 'या' दोन माजी पंतप्रधानांचा दाखला देत राहुल गांधींवर डागली तोफ

SCROLL FOR NEXT